Home | Sports | From The Field | nine years before team india made world record

नऊ वर्षांपूर्वी टीम इंडियाने केला होता अनोखा विक्रम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 22, 2011, 01:03 PM IST

झहीर खानच्‍या भेदक गोलंदाजीसमोर न्‍यूझीलंडचा टिकाव लागला नव्‍हता. नेहरा आणि हरभजन सिंगने त्‍याला दोन-दोन गडी बाद करून चांगली साथ दिली होती.

  • nine years before team india made world record

    नवी दिल्‍ली- टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमध्‍ये अनेक विक्रम केले आहेत. काही विक्रम मोडले गेले तर काही अजूनही अबाधित आहे. असाच एक विक्रम नऊ वर्षांपूर्वी म्‍हणजेच 2002 साली न्‍यूझीलंड दौ-यावर केला होता. हॅमिल्‍टन येथे खेळण्‍यात आलेल्‍या दुस-या कसोटीत न्‍यूझीलंडचा पहिला डाव फक्‍त 94 धावांवर संपुष्‍टात आला होता. या कारनाम्‍याची खूप चर्चा झाली. टीम इंडियाने पहिल्‍या डावात फक्‍त 99 धावाच केल्‍या होत्‍या. क्रिकेट जगतात असे पहिल्‍यांदा झाले होते की, दोन्‍ही संघाचा पहिला डाव 100 धावांच्‍या आत बाद झाला होता.
    टीम इंडियाने 99 धावा बनवल्‍या होत्‍या तेव्‍हा टीम इंडियाला आघाडी मिळेल असे कोणालाच वाटले नसेल. परंतु, झहीर खानच्‍या भेदक गोलंदाजीसमोर न्‍यूझीलंडचा टिकाव लागला नव्‍हता. नेहरा आणि हरभजन सिंगने त्‍याला दोन-दोन गडी बाद करून चांगली साथ दिली होती. टीम इंडियाने तो सामना चार गडयांनी गमावला असला तरी, त्‍यांनी एक नवा विश्‍वविक्रम नोंदवला.

Trending