आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीत, पहिल्या भारतीय महिला ठरल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयओसीवर निवड झालेल्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. - Divya Marathi
आयओसीवर निवड झालेल्या नीता अंबानी या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
रिओ- रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी यांची गुरुवारी रिओ येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (आयओसी)वर वैयक्तिक सदस्य म्हणून निवड झाली. "आयओसी‘च्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयओसीवर निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. वयाच्या 70 वर्षांपर्यंत त्यांचे सदस्यत्व असेल. 52 वर्षीय नीता अंबानींकडे त्यामुळे पुढील 18 वर्षे आयओसीचे सदस्यत्व राहील.
आयओसीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी नीता अंबानींना 39 मतांची गरज होती. मात्र त्यांना एकूण 71 मते मिळाली. याआधी सर दोराबजी टाटा यांनी आयओसीमध्ये भारताचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर राजा रणधीर सिंह हे आयओसीचे मानद सदस्य आहेत. ते वर्ष 2000-2014 पर्यंत आयओसीचे सदस्य होते.
आपल्या निवडीबद्दल नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, भारतीय महिलेला जागतिक स्तरावर मिळालेला हा मोठा सन्मान आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. युवा पिढीला एकत्र करण्याची ताकद खेळात असून, त्या दृष्टीनेच मी काम करेन.
पुढे वाचा, नीता अंबानीचे क्रीडा क्षेत्रात काय आहे योगदान....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...