आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला अलविदा करणार नाही सचिन! टी-20 चॅम्पियन्‍सला नीता अंबानींनी दिली पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच हंगामात आयपीएल आणि चॅम्पियन्‍स लीगचा किताब जिंकून मुंबई इंडियन्‍स टीमचा आयकॉन खेळाडू सचिन तेंडुलकरला संस्‍मरणीय निरोप देण्‍यात आला. टीमने इतका मोठा कारनामा केल्‍यानंतर पार्टी तर झालीच पाहिजे. टीमच्‍या को-ओनर नीता अंबानी यांनी आपल्‍या घरी म्‍हणजे अँटिलिया येथे रविवारी ही कमतरता पण दूर केली. नीता यांनी संपूर्ण टीमला शानदार पार्टी दिली. पार्टीमध्‍ये सचिनवरच सर्वांच्‍या नजरा होत्‍या.

पार्टीत संपूर्ण मुंबई टीमने सचिनची जर्सी नंबर 10 घालून आले होते. सचिननेही मुंबई इंडियन्‍सची साथ सोडणार नसल्‍याचे संकेत दिले आहेत. आयपीएल 6 ची आणि चॅम्पियन्‍स लीगची विजेती टीम मुंबईबरोबर सचिनचे नाते कायम राहणार आहे. पुढच्‍या सत्रात त्‍याचा मुंबई इंडियन्‍स टीमच्‍या व्‍यवस्‍थापनात सहभाग असेल, असा संकेत त्‍याने दिले आहेत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा नीता यांनी सचिन आणि टीमला दिलेल्‍या शानदार पार्टीचे नजारे...