आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NKP Salvae Challenger Trophy Cricket : India Blue Team Won

एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी क्रिकेट:इंडिया ब्ल्यू संघाचे दिल्लीवर विजयाचा शिक्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - गुरुवारी इंदूर येथे झालेल्या एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफीत अक्षत रेड्डी (53) व अभिषेक नायरच्या (91) अर्धशतकाच्या बळावर इंडिया ब्ल्यूने दिल्लीवर 18 धावांनी विजय मिळवला. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर असलेल्या दिल्लीचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (59) दमदार अर्धशतक ठोकून पुनरागमनाचे संकेत दिले.
प्रथम फलंदाजी करताना इंडिया ब्ल्यूने 50 षटकांत 6 बाद 270 धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव 47.5 षटकांत 252 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीची वाईट सुरुवात झाली. सलामीवीर मोहित शर्मा (0) भोपळा न फोडताच बाद झाला. उन्मुक्त चंद (13) आणि कर्णधार विराट कोहली (5) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेला अनुभवी फलंदाज सेहवागने 38 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकार खेचत 59 धावांसह संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला इरेश सक्सेनाने आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. 89 चेंडंूत 65 धावा करणा-या रजत भाटियाचा अंकित राजपूतने त्रिफळा उडवला.


नायरचे शतक हुकले
तत्पूर्वी इंडिया ब्ल्यूतर्फे सलामीवीर नमन ओझा (23) व अक्षत रेड्डीने (53) या जोडीने 56 धावांची सलामी दिली. अर्धशतक ठोकणा-या रेड्डीने वरुण सूदचा त्रिफळा उडवला. मधल्या फळीतील मनीष पांडे (0) व शुभंकर राय (5) मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर संघाची जबाबदारी घेत अभिषेक नायरने 73 चेंडूंचा सामना करताना 13 चौकर व 1 षटकार खेचला. त्याचे शतक अवघ्या नऊ धावांनी हुकले.


संक्षिप्त धावफलक
इंडिया ब्ल्यू: 6 बाद 270 (अक्षत रेड्डी 53, अभिषेक नायर 91, पीयूष चावला 40 धावा, रजत भाटिया (46/3). दिल्ली : सर्वबाद 252 (सेहवाग 59, मिलिंद 22, रजत भाटिया 65 धावा, भुवनेश्वर कुमार (58/3), अंकित राजपूत (44/3).