आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Any Effect On Discussion Of My Retirement Says Sachin Tendulkar

सचिन म्‍हणतो, ‘निवृत्तीच्या चर्चेने काय फरक पडतो?’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रत्येक सामन्यात कोणीही शतक ठोकू शकत नाही. चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी, अशी आशासुद्धा प्रत्येक वेळी ठेवता येत नाही. अनेकजण माझ्या निवृत्तीचा अंदाज बांधतात. मात्र, मी माझे काम करतो. माझ्यावर टीकेचा कसलाही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने एका कार्यक्रमात व्यक्त केली.

‘वर्ल्डकपदरम्यान मी 99 वे शतक ठोकले होते. मात्र, तेव्हा कोणीही 100 व्या शतकावर चर्चा केली नाही. कारण त्या वेळी यापेक्षा अधिक मुद्दे होते. त्यानंतर शंभराव्या शतकावर चर्चा सुरू झाली,’ असेही तो म्हणाला.

माजी खेळाडूंच्या टीकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर सचिन म्हणाला की, लोकांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. क्रिकेट खेळणारेसुद्धा मत मांडतात आणि ज्यांनी क्रिकेट खेळले नाही तेदेखील मत प्रदर्शित करतात. मात्र, मी त्यांच्या टीकेने चिंताग्रस्त नाही.

क्रिकेटची चर्चा केवळ आईसोबत
घरी कधीही क्रिकेटबाबतीत चर्चा करत नाही. मन झाले तर निश्चितपणे आईसोबत क्रिकेटसंबंधी गोष्टीवर चर्चा करतो, असेही त्याने सांगितले.