आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानशी मालिका नको : साैरव गांगुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीमेपलीकडून दहशतवाद थांबत नाही तोवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी थेट क्रिकेट मालिकांना सुरुवात होणार नाही, या बीसीसीआयच्या भूमिकेचे माजी भारतीय आक्रमक कर्णधार अशी ख्याती असलेल्या सौरव गांगुलीने समर्थन केले आहे.
पाकने बीसीसीआयला येत्या डिसेंबरमध्ये पाकमध्ये मालिका आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआयनेही या प्रकरणी प्रयत्न करू, असा शब्द पीसीबीला दिला होता. परंतु गुरुदासपूरवरील दहशतवादी हल्ल्याने मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी उभय देशांदरम्यान मालिका होणे नाही, असे घोषित केले.