आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालुसान - भारताचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखली जाणारी कुस्ती 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतून बाद करण्याचा डाव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) आखला आहे. तशी शिफारस संघटनेने केली असून यामुळे कुस्तीमधील सुपरपॉवर असलेल्या अमेरिका, रशिया आणि भारत या देशांना हादरा बसला आहे. ही शिफारस म्हणजे षड्यंत्र असल्याचा आरोप भारताने केला आहे.
अजूनही आशा : आयओसीचे प्रवक्ते मार्क अॅडम्स यांनी कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर कुस्तीबाबतच्या शिफारशीची माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘कुस्तीप्रेमींनी अगदीच धीर सोडू नये. सध्या केवळ शिफारस केली आहे. याला मंजुरी मिळालेली नाही.’ येत्या मे महिन्यात आयओसीची बैठक रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये होत असून शॉर्टलिस्टेड खेळांपैकी सप्टेंबरमध्ये कोणत्या खेळावर मतदान घ्यायचे ते ठरवले जाणार आहे.
हा भारताला धक्का : रशिया व अमेरिका ऑ लिम्पिकमधून हा खेळ बाद होऊ
देणार नाहीत. शिफारशीमुळे भारताला निश्चितच धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया कुस्ती फेडरेशनचे सरचिटणीस राजसिंह यांनी दिली.
कुस्ती, बेसबॉल-सॉफ्टबॉल (संयुक्तरीत्या), स्क्वॅश, कराटे, स्पोर्ट क्लायंबिंग, वेक बोर्डिंग, वुशू, रोलर स्पोर्ट्स यातील एका प्रकाराच्या समावेशासाठी मतदान होणार आहे.
यशस्वी भारतीय मल्ल
1896 पासून (अॅथेन्स) कुस्ती समाविष्ट आहे. यात भारताचे खाशाबा जाधव (हेलसिंकी, 1952, कांस्य), सुशीलकुमार (बीजिंग, कांस्य, लंडनमध्ये रौप्य) आणि योगेश्वर दत्त (लंडन, कांस्य) यांनी पदके मिळवली.
हे भारताविरुद्ध षड्यंत्र
कुस्तीमध्ये भारताची कामगिरी वरचेवर सुधारत आहे. 2016च्या ऑ लिम्पिकमध्ये 6 ते 8 पदके आणि 2020 मध्ये 12 पदके जिंकण्यासाठी आम्ही आज प्रचंड कष्ट घेत आहोत. कोणत्याही परिस्थितीत कुस्ती ऑ लिम्पिकमधून बाद होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा.
महाबली सत्पाल, सुशीलकुमारचे प्रशिक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.