आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली कसोटी खेळण्यासाठी कांगारूंवर दबाव नाही : संदरलँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - आपला सहकारी खेळाडू फिलिप ह्यूजच्या धक्कादायक मृत्यूनंतर शोकसागरात बुडालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना जर भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत खेळायचे नसेल, तर त्यांच्यावर कोणताच दबाव टाकण्यात येणार नाही. आम्ही खेळाडूंची मन:स्थिती समजू शकतो. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स संदरलँड यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघात उपलब्ध खेळाडूंची निवड केली जाईल.

सामना रद्द केला असता, तर दोन कोटी डॉलरचे नुकसान
आम्ही ब्रिस्बेन कसोटी रद्द करण्याचा विचार केला होता. यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला जवळपास दोन कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागले असते. मात्र, आता ब्रिस्बेन कसोटी अ‍ॅडिलेड आणि मेलबर्नच्या मध्ये १७ ते २१ डिसेंबरदरम्यान होईल. असेही त्यांनी म्हटले. जगभरातील खेळाडूंकडून, चाहत्यांकडून येत असलेल्या संदेशांबद्दल संदरलँड यांनी या वेळी आभार मानले.