आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nobody Took My Fixing Claims Seriously: Sushil Kumar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिलवान सुशीलकुमारची कोलांटउडी!, सामना गमावण्‍यासाठी ऑफर नव्‍हतीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमारने जागतिक कुस्ती स्पर्धेत सामना गमावण्यासाठी आपल्याला कोट्यवधी रुपयांची ‘ऑफर’ होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट केला. मात्र, लगेचच त्याने घूमजाव करत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला असून अशी कोणतीही ऑफर नव्हती, अशी सारवासारव केली. ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकणा-या सुशीलकुमारच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे क्रीडाजगतात खळबळ उडाली आहे.