(फोटो –
जॉन अब्राहम सोबत विजयाचा आनंद साजरा करताना खेळाडू )
गुवाहाटी- पहिल्या हाफ नंतर अंतिम क्षणी कोके नावाने प्रसिध्द असलेला स्पेनचा प्रोफेशनल फुटबॉलर सर्जियो कोंट्रेरर्स पार्दोच्या जबरदस्त गोलमुळे जॉन अब्राहमच्या नॉर्थईस्ट यूनाइटेडने केरळ ब्लास्टर्सवर 1-0 ने रोमहर्षक विजय मिळविला.
सामन्यातील 45व्या मिनटाला एबोरने पगेथकडे थ्रो केला परंतु फुटबॉल गुरविंदरकडे गेला त्याने कोकेला पास दिया आणि कोकेने कोणतीच चूक न करता शानदार गोल केला. गोलकीपर डेव्हिड जेम्सला चूकवत बॉल गोलजाळीत पोहाचला आणि तमाम नॉर्थईस्ट संघाच्या प्रेमींनी स्टेडिअमध्ये आनंद साजरा केला.
केरळ ब्लास्टर्सने गमावली संधी
केरळकडे 16 मिनिटाला सामन्यात आघाडीची संधी होती. परंतु हुमेने केलेला गोल रेफरीने ऑफसाइड ठरवला.
नॉर्थईस्टने निर्धारित वेळेत गोल करण्याच्या 10 संधी गमावल्या. तर केरळने गोल करण्याचे सहा संधी गमावल्या.
काय म्हणाला सचिन
केरळ संघाचा सह मालक असलेला सचिन तेंडुलकर म्हणाला की, ICL मुळे भारतीय फुटबॉलचा चेहरामोहरा बदलणार आहे. नक्कीच फुटबॉलला भारतात चांगले दिवस येतील. खेळाडूही अत्यंत शिस्तीने खेळत असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची रोमहर्षक छायाचित्रे..