आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडररचा विक्रम मोडणे सोपे काम नाही- नदाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - रॉजर फेडररने टेनिस करिअरमध्ये 17 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत. त्याच्या या विक्रमाला ब्रेक करण्यासाठी वेळ लागेल, अशी प्रतिक्रिया आठ वेळचा फ्रेंच ओपन विजेता राफेल नदालने दिली.


27 वर्षीय नदालच्या नावे 12 ग्रँडस्लॅम किताब आहेत. यामध्ये आठ फ्रेंच ओपन, दोन विम्बल्डन, एक अमेरिकन ओपन, एक ऑस्ट्रेलियन ओपनचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये 32 व्या वर्षात पदार्पण करणा-या फेडररने शेवटचा ग्रँडस्लॅम 2012 मध्ये विम्बल्डन येथे जिंकला होता. तो जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे. निवृत्ती घेण्यापूर्वी तो अधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शक्यता आहे. फ्रेंच ओपनच्या विजेतेपदासह नदाल जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नदाल म्हणाला की, फेडररचा विक्रम ब्रेक करणे आणि तिथपर्यंत पोहोचणे हे माझ्यासाठी फार आव्हानात्मक आहे. याविषयी अद्याप मी कोणत्याही प्रकाराचा विचारही करत नाही.