आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novac Jokovic Wins Australian Open For Third Time

योकोविकची ऑस्‍ट्रेलियन ओपन विजेतेपदाची हॅटट्रिक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्बियाच्या नोवाक योकोविकने अजिंक्यपदाची हॅटट्रिक केली आहे. मेलबबोर्नच्या रॉड लेव्हर अरेनामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात योकोविकने ब्रिटनच्या अँडी मरेवर सहज मात करुन विजेतेपदावर तिस-यांदा नाव कोरले.

सुमारे तीन तास चाळीस मिनिटे चाललेला हा सामना योकोविकने 6-7 ,7-6, 6-3, 6-2 असा जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये योकोविकचे हे एकूण चौथं आणि सलग तिसरे जेतेपद आहे. अशी कामगिरी बजावणारा योकोविक ओपन युगातला पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. तसेच योकोविकचे हे कारकीर्दीतील सातवं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.