आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Became Wimbledon Champion By Defeating Fedrer

फेडररला पराभूत करून नोवाक योकोविक बनला विम्बल्डन चॅम्पियन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अव्वल मानांकित नोवाक योकोविकने रॉजर फेडररला नमवत दुसर्‍यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने स्वित्झर्लंडच्या फेडररला 6-7 (7), 6-4, 7-6 (4), 5-7, 6-4 अशा सेटमध्ये पराभूत केले. अत्यंत अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये फेडररने स्वत:च्याच सर्व्हिसवर एक गेम पॉइंट वाचवला. मात्र, त्यानंतर लगेचच योकोविकने अकराव्या गेममध्ये गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले. सर्बियाच्या योकोविकने आतापर्यंत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे, तर फेडररने आतापर्यंत 17 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून तो नवव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, योकोविककडून पराभव झाल्याने त्याला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.