आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Djokovic Beats Andy Murray To Win Fifth Miami Open Title

योकोविक पाचव्यांदा मियामी ओपनचा विजेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - वर्ल्ड नंबर वन सर्बियाच्या नोवाक योकोविकने फायनलमध्ये अँडी मरेला पराभूत करून पाचव्यांदा मियामी ओपनचे विजेतेपद पटकावले. अव्वल मानांकित योकोविकने तिसरा मानांकित इंग्लंडच्या अँडी मरेला ७-६, ४-६, ६-० ने हरवत किताब आपल्या नावे केला.

सामन्याचा पहिला सेट चढउताराचा ठरला. दोघांनी पहिला सेट जिंकण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. मात्र, यात योकोविक यशस्वी ठरला. यानंतर दुसर्‍या सेटमध्ये मागे पडल्यानंतर मरेने जबरदस्त पुनरागमन करताना योकोविकला ४-६ ने पराभूत करून सामना बरोबरीत आणला होता. मात्र, योकोविकने निर्णायक आणि तिसर्‍या सेटमध्ये चॅम्पियनप्रमाणे खेळ करताना ६-० ने बाजी मारली. यासह किताबही त्याने जिंकला.

सामना कठीण होता : योकोविक
सामन्यानंतर योकोविक म्हणाला, "हा अत्यंत संघर्षपूर्ण सामना होता. कडक उन्हात खेळाडूंना त्रस्त करणारा हा सामना होता. शारीरिक रूपाने तयार होणे आणि कोर्टवर याची अनुभूती करणे हे पूर्णत: वेगळे असते. अँडी मरे तगडा प्रतिस्पर्धी आहे. तो तुम्हाला कोर्टवर घाम गाळण्यास भाग पाडतो. हा सामना जिंकल्याने मी आनंदित आहे.'

आज माझा दिवस नव्हता : मरे
लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणारा २७ वर्षीय अँडी मरे म्हणाला, "मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले. मात्र, फायनलला माझा दिवस नव्हता. मी हा सामना जिंकेल, असे मला एकवेळ वाटले होते. मात्र, तिसर्‍या सेटपर्यंत मी खूप थकलो होतो. माझे पाय थकले होते. परिणामी मी हरलो. योकोविकने शानदार खेळ केला आणि तो चॅम्पियन बनला.'