आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Novak Djokovic Defeats Andy Murray To Win Australian Open

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोवाक योकोविक चॅम्प; करिअरमध्ये ८ वे ग्रँडस्लॅम जिंकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील नंबर वन नोवाक योकोविक रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सर्बियाच्या योकोविकने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या अँडी मरेचा पराभव केला. तीन तास ३९ मिनिटे रंगलेल्या लढतीत अव्वल मानांकित योकोविकने ७-६, ६-७, ६-३, ६-० अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्याने पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे अजिंक्यपद जिंकले.

पराभवासह इंग्लंडच्या मरेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वेळी त्याने दिलेली झुंज अपयशी ठरली. मरेने दमदार पुनरागमन करताना दुसरा सेट जिंकला. यासह त्याने लढतीत बरोबरी साधली. त्याला ८० मिनिटे झुंज द्यावी लागली. टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या या सेटमध्ये मरेने ७-६ ने बाजी मारली.