आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Novak Djokovic Far From Perfect Against Aggressive Rafael Nadal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माँट्रियल मास्टर्स चषक : नदाल-राओनिक समोरासमोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माँट्रियल - स्पेनचा राफेल नदाल व कॅनडाचा मिलोस राओनिक यांच्यात माँट्रियल मास्टर्स चषक टेनिस स्पर्धेची फायनल होणार आहे. नदालने जगातील नंबर वन नोवाक योकोविकला पराभूत केले. त्याने 6-4, 3-6, 7-6 अशा फरकाने सामना जिंकला. राओनिकने वासेक पोसपिसिलचा पराभव केला. 11 व्या मानांकित राओनिकने 6-4, 1-6, 7-6 ने विजय मिळवला.

यापूर्वी जूनमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत स्पेनच्या खेळाडूने पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत नंबर वन खेळाडूला पराभूत केले होते.

रॉर्जस चषक : सेरेना, क्रिस्टिया फायनलमध्ये
टोरँटो 2 जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स व रोमानियाची सोराना क्रिस्टिया यांच्यात रॉर्जस चषक टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदासाठी अंतिम सामना होणार आहे. अव्वल मानांकित सेरेनाने महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत पोलंडच्या एग्निजस्का रंदावास्काचा 7-6, 6-4 ने पराभव केला. दुसर्‍या उपांत्य लढतीत क्रिस्टियाने चीनच्या ली नावर 6-1, 7-5 ने मात केली.