आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Novak Djokovic In Finals Of Monte Carlo Masters Tennis Cup

माेंटे कार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धा : नाेवाक याेकाेविकने पटकावले अजिंक्यपद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेंटे कार्लाे - जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक माेंटे कार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने रविवारी पुरुष एकेरीचा किताब पटकावला. सर्बियाच्या या खेळाडूने अंतिम सामन्यात चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचचा पराभव केला. त्याने ७-५, ४-६, ६-३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. यासाठी त्याला दाेन तास ४२ झुंज द्यावी लागली. या सामन्यातील पराभवाने सहाव्या मानांकित बर्डिचला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
नदालचा दारुण पराभव
माजी नंबर वन राफेल नदालला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारून सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकने जागतिक क्रमवारील अापले अव्वल स्थान सिद्ध केले. जगातील नंबर वन याेकाेविकने माेंटे कार्लाे मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सर्बियाच्या खेळाडूने ६-३, ६-३ ने उपांत्य सामना जिंकला. दमदार सुरुवात करताना अव्वल मानांकित याेकाेविकने पहिल्या सेटमध्ये सहज बाजी मारली. नदालने त्याला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पेनच्या खेळाडूला समाधानकारक यश संपादन करता अाले नाही.

माेफिल्सचा पराभव
चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचने उपांत्य सामन्यात शानदार विजयाची नाेंद केली. यासह त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने गेल माेफिल्सचा पराभव केला. बर्डिचनने ६-१, ६-४ ने विजय संपादन केला. यासह त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला हाेता. मात्र, त्यालाही पराभवाला सामाेरे जावे लागले.