आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेलबर्न - सर्बियाच्या नोवाक योकोविकने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावून टेनिसच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. या स्पर्धेतील पुरुष एकेरीत हे त्याचे सलग तिसरे विजेतेपद ठरले आहे. स्पर्धेतील ओपन एरामध्ये किताबांची हॅट्ट्रिक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. महिला गटात बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने बाजी मारली.
गेल्या दोन वेळेसचा चॅम्पियन योकोविकने फायनलमध्ये तिसरा मानांकित अमेरिकेच्या अँडी मुरेला हरवले. ऑलिम्पिक चॅम्पियन मुरेने पहिला सेट 7-6 ने जिंकला होता. मात्र, यानंतर त्याचा टिकाव लागला नाही. जगातला नंबर वन योकोविकने पुढचे तीन सेट 7-6, 6-3, 6-2 ने जिंकून सामना आपल्या नावे केला. तीन तास आणि 40 मिनिटे ही लढत चालली.
सहावे ग्रँडस्लॅम : योकोविकचे हे ऑस्ट्रेलियन ओपनचे चौथे (2008, 2011, 2012, 2013) विजेतेपद ठरले. त्याने 2011 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनसह आतापर्यंत एकूण 6 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.
ब्रायन बंधूंचे विक्रमी 13 वे जेतेपद : अमेरिकेचे जुळे ब्रायन बंधू बॉब आणि माईक यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळवले. त्यांनी फायनलमध्ये हॉलंडचा रॉबिन हासे आणि इगोर सिजलिंग यांना 6-3, 6-4 ने हरवले. या विजयासह ब्रायन बंधूंनी जोडीच्या रूपाने सर्वाधिक 13 ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकण्याचा रेकॉर्ड केला. यापूर्वीचा 12 ग्रँडस्लॅमचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा जॉन न्यूकोबे आणि टोनी रोश यांच्या नावे होता. ब्रायन बंधूंचे हे सहावे ऑ स्ट्रेलियन ओपनचे जेतेपद आणि एकूण 84 वे एटीपीचे जेतेपद ठरले.
अजारेंका नंबर वनच्या स्थानी कायम
गत चॅम्पियन बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने शनिवारी स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले. तिने फायनलमध्ये चीनच्या ली ना हिला 4-6, 6-4, 6-3 ने हरवले. या विजयानंतर आता पुढचे आणखी काही दिवस नंबर वनच्या खुर्चीवर तिचे साम्राज्य कायम असेल. अजारेंकाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.