आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता लक्ष्य विश्व सुवर्णाचे - योगेश्वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा मल्ल योगेश्वर दत्तने आता आगामी विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकून रियो ऑलिम्पिक साठी पात्रता मिळवण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
मला सर्व महत्त्वपूर्ण स्पर्धेत पदक मिळाले आहे. मात्र, विश्व चॅम्पियनशिपमध्ये मिळालेले नाही. मी या स्पर्धेत पदक मिळवू इच्छितो, विशेष करून सुवर्णपदक. या स्पर्धेतून २०१६ च्या रियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे. येथे मी पदक पटकावले तर ऑलिम्पिकमध्ये खेळणे निश्चित होईल, असे योगेश्वर म्हणाला. चॅम्पियनशिप पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्स वेगास येथे होणार असून रियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी पहिली संधी असेल. या स्पर्धेतून मोठ्या प्रमाणात खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवतात.

नवीन वजन गट माझ्यासाठी योग्य
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नवीन नियमानुसार योगेश्वर आता ६५ किलो वजन गटात खेळत आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये तो ६० किलो वजन गटात खेळला होता. योगेश्वरने आपल्या नवीन ६५ किलो गटात फ्री स्टाइलमध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा, ग्लास्गो राष्ट्रकुल, इंचियोन आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. हा वजन गट माझ्यासाठी अगदी योग्य आहे. इटलीत मी विश्व चॅम्पियनला हरवले तर ग्लास्गोत २ मिनिटांत सर्व सामने जिंकले. आशियाई स्पर्धेत देखील मी चांगली कामगिरी केली. २८ वर्षांनंतर देशाने या स्पर्धेत सुवर्ण मिळवले. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. हा मोठा कार्यकाळ होता, असे योगेश्वर म्हणाला.