आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता अभियांत्रिकी महाविद्यालयातही क्रीडा संचालक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाप्रमाणे आता राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातही शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यापूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयात विषय प्राध्यापकांकडे जबाबदारी दिली जात होती. या निर्णयामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील खेळाडूंनाही स्पर्धेत भाग घेण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे.

राज्याचे क्रीडा व युवा धोरण 2012 याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने कुलगुरूंची संयुक्त मंडळ समिती गठीत केली होती. त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार ही अंमलबजावणी राज्य शासनाने केली आहे. तसेच अन्य महाविद्यालयातील गरज नसलेल्या मंजूर पदाचे सर्मपण करून मंजूर पदांतर्गच प्राधान्याने शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडा मार्गदर्शक या पदांची निर्मिती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तसेच किमान गुणवत्तापूर्वक क्रीडा सुविधांची खातरजमा केल्यानंतरच नवीन महाविद्यालयांना संबंधित विद्यापीठाकंडून मान्यता मिळणार आहेत. विद्यापीठांनाही किमान क्रीडा सुविधांचे बंधन घातले आहे. विद्यापीठांनी त्यांच्या निधीतून या सुविधा द्याव्यात. तसेच विद्यापीठांनी 10 टक्के क्रीडा निधी सुविधा पुरविण्यासाठी खर्च करावा.
विद्यापीठासाठी 400 मीटर ट्रॅक, इनडोअर स्टेडियम, ऑलिम्पिक मानांकन तलाव, फुटबॉल व हॉकीचे एकत्रित कृत्रिम मैदान, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, टेनिस, हँडबॉल आदी मैदानी खेळांकरिता मैदाने व साधने.

राज्य विद्यापीठ क्रीडा मंडळाची निर्मिती
विविध विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये क्रीडा उपक्रमाच्या योजना आखण्याकरिता व कार्यान्वित करण्याकरिता क्रीडा धोरण 2012 नुसार राज्य विद्यापीठ क्रीडा मंडळाची निर्मिती करावी, अशी सूचना शासननिर्णयात केली आहे.
महाविद्यालयासाठी कार्यात्मक व्यायामशाळा, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेनिस, हँडबॉल आदी मैदाने. टेबल टेनिस व बँडमिंटनसाठी इनडोअर स्टेडियम आणि मैदान.


या सुविधा आवश्यक
क्रीडा धोरणातले ठळक निर्णय

0 पदवीच्या तिन्ही वर्षांसाठी 10 गुणांची शारीरिक शिक्षण परीक्षा
0 आरोग्य शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश
0 युवक दिन, युवक आठवडा आदी दिन साजरे करणे बंधनकारक
0 प्रत्येक वर्षी युवक साहित्य शिखर परिषदेचे आयोजन करणे आवश्यक
0 विद्यापीठात युवक अदलाबदल कार्यक्रम बंधनकारक असेल
0 विद्यापीठ निधीतून 500 विद्यार्थ्यांच्या युवक वसतिगृहाची सुविधा
0 खेळाडूंकरिता प्रगतिशील शिक्षण शिबिरांचे आयोजन आवश्यक