आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘द्विस्तरीय क्रिकेट’चा आयसीसीकडून विचार, नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पारंपरिक क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचा आयसीसी गंभीरपणे विचार करत आहे. या महिनाअखेरीस होणा-या कार्यकारिणीच्या बैठकीत यावर विचार करण्याचा आयसीसीचा मनोदय आहे. कसोटी क्रिकेटची चॅम्पियनशिप स्पर्धा, जगभरातील क्रिकेट रसिक आणि आयसीसीच्या सदस्य देशांमध्ये फारसा रस निर्माण करू शकली नाही. त्यामुळे टेस्ट (कसोटी) चॅम्पियनशिप स्पर्धेला पर्याय म्हणून द्विस्तरीय क्रिकेटचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पदोन्नती आणि पदावनतीच्या या द्विस्तरीय क्रिकेटबाबत निश्चित अशी रूपरेखा आयसीसीने आखली नाही. मात्र, दर चार वर्षांनी प्रत्येक संघाला आपल्या कसोटी स्तरासाठी निश्चित असा निकष निश्चित करण्यात येणार आहे. अशा बदलामुळे झिम्बाब्वे, बांगलादेश यांच्यासारख्या कायम तळाला असणा-या संघांना दोन स्तर झाल्यास निम्न स्तरातील संघाविरुद्ध आपल्या कामगिरीचा आलेख उंचावता येईल. यामुळे आयर्लंड, अफगाणिस्तान यांच्यासारख्या देशांनाही कसोटी संघांच्या उच्चस्तरीय यादीत येता येईल.
इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल वॉनने याबाबत आपले मत व्यक्त केले. ‘फुटबॉल प्रीमियर लीगप्रमाणे क्रिकेटच्या पहिल्या डिव्हिजन किंवा उच्चस्तरीय गटात खेळणा-या खेळाडूला आणि त्याच्या देशाच्या संघाला अधिक महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे दोघांनाही अधिक आर्थिक मोबदला मिळेल. त्यामुळे आयपीएलसारख्या लीगमध्ये खेळण्यापेक्षा खेळाडू अधिक पैसे मिळाल्यास आपल्या देशाच्या संघाकडून खेळण्यास प्राधान्य देतील’, असे वॉनने म्हटले.
द्विस्तरीय क्रिकेटमध्ये पहिल्या डिव्हिजनमधील अव्वल क्रमांकाच्या संघाला अधिक आर्थिक
लाभ होऊ शकतात.
...तर देशाकडून खेळण्याचे महत्त्व वाढेल
कसोटी क्रिकेट खेळणा-या संघांची दोन गटांत उच्च् व निम्न अशा स्तरांत विभागणी केल्यास दोन्ही विभागांत खेळणा-या संघांच्या खेळाडूंना आयपीएलसारख्या स्पर्धेत खेळण्यापेक्षा देशाच्या संघाकडून खेळण्यात अधिक रस निर्माण होईल. यामुळे कसोटीचा दर्जा वाढेल आणि खेळाडूही वाढतील, असे इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याला वाटते.