आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय संघाचे आता वर्षभर ‘नॉन स्टॉप मैदान-ए-जंग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मागील एका महिन्यापासून विश्रांती घेत असलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू आता वर्षभर व्यग्र राहणार आहेत. त्यांना विश्रांती घेण्याची संधी मिळणार नाही. येत्या वर्षभरापर्यंत भारतीय संघाचे क्रिकेटचे वेळापत्रक अधिकच बिझी असेल.


भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर झिम्बाव्वे दौ-यावरही गेला नव्हता.अशा प्रकारे त्याने जवळजवळ दोन महिने आपल्या कुटुंबीयांसमवेत घालवले. मात्र, आता अशी दीर्घ विश्रांती मिळणे अवघड आहे. 21 सप्टेंबरपासून चॅम्पियन्स लीगला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेनंतरही भारतीय संघातील खेळाडू व्यग्र होतील.


चॅम्पियन्स लीगमध्ये आयपीएलचे चार संघ खेळत आहेत. त्यामुळे बहुतांश भारतीय खेळाडूंचा टी-20 क्रिकेटनेच नव्या सत्राचा प्रारंभ होईल. या स्पर्धेनंतर भारतीय संघाला 10 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टी-20 आणि सात वन डे सामन्यांची मालिका खेळावी लागेल.


सचिनला 200 वी कसोटी भारतामध्येच खेळण्याची संधी देण्यासाठी बीसीसीआयने नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय संघ आफ्रिका व न्यूझीलंड दौ-यावर जाणार आहे. 19 जानेवारीदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी आणि पाच वनडे होणार आहेत. हा दौरा 18 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर मायदेशी परतलेला भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करेल. या ठिकाणी 24 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. मात्र, भारतीय संघातील खेळाडू सातव्या आयपीएल स्पर्धेची तयारी सुरू करतील. हे आयपीएल दोन महिन्यांपर्यंत चालेल.


वर्षभरातील वेळापत्रक
1. चॅम्पियन्स लीग
2. वेस्ट इंडीजचा भारत दौरा
3. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
4. भारताचा न्यूझीलंड दौरा
5. भारताचा आशिया चषकासाठी बांगलादेश दौरा
6. आयपीएल-7 चे सामने
7. भारताचा इंग्लंड दौरा