आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनिफर लोपेजबरोबर घेतलेला पंगा शाहरुख खानला महागात पडणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- एकीकडे अंबानी बंधूंत समेट झाले आहे तर, दुसरीकडे बसपा नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हातात महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अशाच आजपासून आयपीएलचा रोमांच भरी तडका सुरु होत आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे शाहरुख खान पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

आयपीएलमधील कोलकाता नाइटराइडर्सचे मालक आणि बॉलिवूड स्‍टार शाहरुख खानच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एमसीएचा वाद आणि मनोज कुमार यांनी मानहानीचा दावा ठोकल्यानंतर आता हॉलिवूड स्‍टार आणि पॉप सिंगर जेनिफर लोपेजने किंग खानवर आपली प्रतिमा मलीन करण्याचा आरोप लगावला आहे. जेनिफर-शाहरुख यांच्या वादातील परिणाम इतर इंटरनॅशनल कलाकारांवरही पडणार असल्याचे दिसते.

हॉलिवूड अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, शाहरुख खानने आयपीएल-6 च्या ओपनिंग सेरेमनीबाबत जेनिफरच्या मागण्या आणि अटींबाबत चुकीच्या बातम्या मीडियात पसरवल्या जात आहेत. जेनिफरने आपली प्रतिमा बिघडवल्याचा शाहरूखची कंपनी रेड चिलीजला दोषी धरले आहे.

आयपीएल-6 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जी डील होत होती त्याची माहिती फक्त जेनिफर आणि रेड चिलीज कंपनीच्याच काही लोकांना होती. जेनिफरला संशय आहे की, या सर्व घटना शाहरुख खानच्या रेड चिलीजच्या लोकांनी माध्यमांपर्यंत पोहचवल्या आहेत.