आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडेत नुवान कुलशेखराने केली कांगारूंची शिकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - नुवान कुलशेखराने (5/22) धारदार गोलंदाजी करून तिस-या वनडेत कांगारूंची शिकार केली. कुलशेखराच्या गोलंदाजीपाठोपाठ दिलशान (22), परेरा (22) यांनी केलेल्या शानदार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वनडे 4 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणा-या ऑ स्ट्रेलियाचा 26.4 षटकांत अवघ्या 74 धावांवर धुव्वा उडाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. या विजयासह लंकेने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली.

ऑ स्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुलशेखराच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ऑ स्ट्रेलियाचा 26.4 षटकांत अवघ्या 74 धावांवर खेळ खल्लास केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 20 षटकांत सहा गडी गमावून 75 धावा काढून सामना आपल्या नावे केला.