कोची येथे आजपासून सुरु झालेल्या भारत विरुध्द वेस्ट इंडिज यांच्यामधील पहिल्याच सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्टइंडिज संघ भारत दौ-यावर आला आहे.
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सहा खेळाडूंच्या पतनानंतर 321 धावा केल्या आहेत. डॅरेन सॅमी (10) आणि सॅम्युअल्स (126) धावांवर नाबाद राहिले आहेत.
शमीने दिला पहिला धक्का
भारताचा मध्यगती गोलंदाज महोम्मद शमीने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला आहे. त्याने सलामीवीर ड्वेन ब्राव्होला शिखर धवन करवी झेलबाद केले.
वेस्टइंडिज क्रिकेट संघाचे खेळाडू सॅलरीवरून वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डवर नाराज आहे. त्यामुळे खेळाडू संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु असे काही न होता विंडिज संघ मैदानात उतरला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, उभय संघ