आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officials Demand Fans Only Wave Bangladesh Flag, News In Marathi

प्रेक्षकांना दुसर्‍या देशाचा झेंडा हाती घेण्यास मज्जाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत यजमान बांगलादेशने स्थानिक प्रेक्षकांना स्पर्धेत सहभागी इतर देशांचा झेंडा हाती घेण्यास मज्जाव केला आहे. कोणताही बांगलादेशी प्रेक्षक इतर देशांचा झेंडा फडकवताना दिसल्यास त्याला स्टेडियमबाहेर करण्यात येईल. नुकत्याच समाप्त झालेल्या आशिया कपदरम्यान स्थानिक प्रेक्षकांनी पाकिस्तानचा ध्वज फडकावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला, असे आयोजकांनी सांगितले.

बांगलादेश 1971 च्या युद्धापूर्वी पाकिस्तानचा भाग होता. काही स्थानिक समर्थक देशाच्या ध्वजासंबंधी नियमांचे उल्लंघन करत विदेशी ध्वज फडकवताना मंडळाच्या निदर्शनास आले. याबाबत आदेश मिळाल्याने आम्ही सुरक्षा अधिकार्‍यांना स्थानिक प्रेक्षक सामन्यादरम्यान विदेशी ध्वज फडकवताना दिसल्यास त्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.