आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राँझ विजेत्या साक्षी मलिकचे दिल्लीत जोरदार स्वागत, हरियाणाच्या 5 मंत्र्यांची हजेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादूरगड येथे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी साक्षीचे भव्य स्वागत केले. - Divya Marathi
बहादूरगड येथे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी साक्षीचे भव्य स्वागत केले.
नवी दिल्ली- महिला कुस्तीत देशाला पहिले ऑलिंपिक मेडल जिंकून देणारी साक्षी मलिक हिचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. बुधवारी पहाटे सकाळी 3.30 वाजता साक्षीचे दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर आगमन झाले. तिला रिसिव्ह करण्यासाठी हरियाणा सरकारचे 5 मंत्री उपस्थित होते. यासोबतच साक्षीचे कुटुंबिय आणि गावातील लोकही तेथे पोहचले होते. आज रोहतक येथे साक्षीचा रोडशो होणार आहे. दुसरीकडे, हरियाणा सरकारने साक्षी मलिकला राज्याच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेचे ब्रॅंड अॅम्बेसेडर बनवले आहे. बहादुरगडात होणार सन्मान...

- दिल्ली एयरपोर्टवर साक्षीला रिसीव्ह करण्यासाठी हरियाणा सरकारमधील मंत्री अनिल विज, कविता जैन आदी पोहचले.
- साक्षीची विजयी मिरवणूक रोहतकपासून मोखरा गावांपर्यंत काढली आहे.
- साक्षीला रिसीव्ह करण्यासाठी तिचे कुटुंबिय मंगळवारी रात्रीच दिल्लीला रवाना झाले आहेत.
- साक्षीला हरियाणाचे सीएम मनोहर लाल खट्टर बहादुरगढ येथे सन्मानित करतील. तसेच ते साक्षीला 2.5 कोटीचा चेक देतील.
12 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले-
- साक्षी मलिकने सांगितले की, तिचे 12 वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले.
- तिचे पिता सुखबीर मलिक म्हणाले, एक वेळ असा होता जेव्हा 2003 मध्ये मुलीने कुस्ती शिकण्याचा हट्ट केला तेव्हा तेव्हा आम्हाला लोकांचे खूप काही ऐकून घ्यावे लागले. मात्र, मुलीची जिद्द पाहून आम्हीही होकार दिला. देश आणि प्रदेश सरकारने बेटी बचाओ- बेटी पढ़ाओचा नारा दिला आहे. मला वाटतेय बेटी खिलाओ हा नारा देण्याची गरज आहे.
51 किलोची गदा देऊन होणार सन्मान-
साक्षी मलिकचा सन्मान म्हणून तिला 51 किलोची गदा दिली जाणार आहे. कारण कोणत्याही पैलवानाचा सन्मान गदा देऊन केला जातो.
साक्षीसाठी उभारले जाणार सर्वात उंच स्टेज-
- मोखरात राहणारे फुलकुमार मलिक यांनी सांगितले की, मंडपात तीन स्टेज बनवले जातील. साक्षी सर्वात वरच्या स्टेजवरील बसेल. एक स्टेज व्हीआईपी लोकांसाठी तर तिसरा स्टेज प्रतिष्ठित व्यक्तींसाठी असेल.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, हरियाणाचे पाच मंत्री पोहचले साक्षीच्या स्वागताला...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...