आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympic Bronze medallist Mary Kom Gears Up For The CWG

मिशन राष्ट्रकुल : दोन वर्षांनंतर मेरी कोमचे पुनरागमन, सरावाला सुरवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॉक्सर मेरी कोमसह भारताच्या महिला खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. यात तब्बल दोन वर्षांनंतर मेरी कोमने पुनरागमन केले आहे. ती यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत 51 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच तिच्यासोबत वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील एल. सरितादेखील राष्ट्रकुल स्पर्धेत नशीब आजमावणार आहे. सरिता ही 60 किलो वजन गटात खेळणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्डन पंच मारण्याचा निर्धार केल्याची प्रतिक्रिया या वेळी सरिताने दिली.
‘आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मागील दोन वर्षांनंतर मी पुनरागमन करत आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी मला जोमाने तयारी करावी लागेल. या स्पर्धेतील कामगिरीद्वारे मला रिओ ऑलिम्पिकसाठीही स्वत:ला सिद्ध करायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया मेरी कोमने दिली.
भारताकडून सरीता आणि मेरी कोमकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची आशा आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील चांगला अनुभव युवा खेळाडू सरीताच्या पाठीशी आहे