आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Olympic Gold Medallist Shooter Abhinav Bindra Announces Retirement From Professional Shooting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धा: नेमबाज अभिनव बिंद्राने केली निवृत्‍तीची घोषणा, रियोमध्‍ये खेळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - बिजिंग ऑलिम्पिकमध्‍ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणा-या अभिनव बिंद्राने भारतासाठी कास्‍य पदकाची कमाई करुन इतिहास रचला आहे. बिंद्राने आशियाई खेळानंतर निवृत्‍तीची घोषणा केली आहे.
ट्विटर वर केली घोषणा
अभिनव बिंद्राने ट्विटरवर स्‍पष्‍ट केले आहे की, ''एक व्‍यावसायिक नेमबाज म्‍हणून माझा बुधवारचा शेवटचा दिवस असणार आहे. यानंतर मी एैच्छिक स्‍वरुपात नेमबाजी करणार आहे.''
बिंद्राने आशियाई स्‍पर्धेतील चौथ्‍या दिवशी 10 मीटर एअर रायफल पुरुष सांघिक प्रकारात भारताला कास्‍यपदक मिळवून दिले.
अभिनव बिंद्रा, रवी कुमार आणि संजीव राजपूत यांनी सांघीक प्रकारात 1863 गुण प्राप्‍त करत तिसरे स्‍थान पटकावले आहे. चीनने 1886.4 गुणांची कमाई करत सुवर्णवेध घेतला आहे तर दक्षिण कोरियाने 1867.6 गुणांची कमाई करत रौप्‍य पदक पटकाविले आहे.
भारताकडून बिंद्राने 625.4 गुण, रवि कुमारने 618.9 आणि संजीव राजपूतने 618.7 गुण बनविले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, अभिनव बिंद्राचे छायाचित्रे..