आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक असोसिएशनवर गेल्या 14 महिन्यांपासून असलेली बंदी अखेर उठवली. या निर्णायमुळे भारताचा ऑलिंपिक वनवास संपला असून भारतीय खेळाडूंना भारतीय ध्वजाखाली या खेळांमध्ये सामिल होण्यातील अडथळा दूर झाला आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओसी) नियमांप्रमाणे भारतीय ऑलिंपिक असोसिएशनची (आयओए) रविवारी निवडणूक झाली. त्यात एन. रामचंद्रन यांची आयओएच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीत रामचंद्रन एकमेव उमेदवार असल्याने त्यांची अध्यक्षपदी झालेली निवड केवळ औपचारिकता होती. रामचंद्रन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची कनिष्ठ बंधू आहेत.
निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला सामिल होण्याची परवानगी दिल्याने आणि केंद्र सरकारचे क्रीडा धोरण पाळल्याने आयओसीने 4 डिसेंबर 2012 रोजी आयओएवर बंदी घातली होती. तत्पूर्वी, आयओसीचे नियम पायदळी तुडवून आयओएने निवडणुका घेतल्या होत्या. त्यात चौटाला विजयी झाली होती. परंतु, आयओसीने चौटाला आणि त्यांच्या टीमला मान्यता न देता आयओएवर बंदी घातली होती.
त्यानंतर आयओसीने आयओए आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी बंदीवर सविस्तर चर्चा झाली. आयओएने आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. तरीही आयओसीने बंदी मागे घेतली नाही. जोपर्यंत नियमानुसार निवडणुका होता नाही तोपर्यंत बंदी मागे घेतली जाणार नाही, असे आयओसीने स्पष्ट केले होते.
आयओसीने आयओएवर घातलेली बंदी योग्य होती, असे आपल्याला वाटते का...आपली प्रतिक्रिया द्या... आमच्या फेसबुक पेजला भेट द्या...
https://www.facebook.com/pages/Divya-Marathi/195167917196092?ref=hl
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.