आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympic News In Marathi, Kenediyana Charles Hemilina Became The Champion , Divya Marathi

सोची हिवाळी ऑलिम्पिक : चार्ल्स हॅमिलिन चॅम्पियन, स्पीड स्केटिंगमध्ये टिआयूला रौप्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोची- कॅनडाचा चार्ल्स हॅमिलिन 22 व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने 1500 मीटर स्पीड स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्याने 2 मिनिटे 14.985 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. याशिवाय चार्ल्सने स्पर्धेत कॅनडाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या या गटात चीनचा टिआयू हान रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
2022 च्या यजमानपदासाठी चीन उत्सुक : आगामी 2022 हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचा चीनने दावा केला आहे. या स्पर्धेच्या यजमानपदासाठी आम्ही उत्सुक असल्याची माहिती चीनच्या ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष यांग शुआन यांनी दिली. या स्पर्धेच्या यजमानपदासह चीनच्या नावे नवा विक्रम होईल. हिवाळी व उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन करणारे चीन जगातील पहिले ठिकाण ठरेल. यापूर्वी येथे 2008मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा झाली.
केशवन 37 व्या स्थानी
भारताचा शिवा केशवनला ल्युज प्रकारात 37 व्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याने 2 मिनिटे 44.604 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण केले. 2011 आणि 2012 च्या आशियाई चॅम्पियन शिवाने तिसर्‍या हिटमध्ये 54.706 सेकंदांची वेळ घेतली होती.
04 सर्वाधिक कांस्यपदके नॉर्वेच्या नावे
07 पदकांसह नॉर्वे दुसर्‍या स्थानी