आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ पात्र, फ्रान्‍सवर 8-1 ने दणदणीत विजय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉकीचा ‘बादशहा’ म्हणून ओळखल्या जाणा-या भारतीय पुरुष संघाने रविवारी लंडन ऑलिम्पिकवारीचे तिकीट बुक केले. पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात दुबळ्या फ्रान्सला 8-1 ने तुडवत भारताने ऑलिम्पिक प्रवेशाने स्वप्न साकारले. गत स्पर्धेतील पराभवातून सावरलेल्या भारताने हॉकी ऑलिम्पिकमधील असलेले वर्चस्व राखून ठेवण्यासाठी दमदार पुनरामन केले आहे.
डग फ्लिकर संदीपच्या 5 गोलच्या बळावर भारताने धडाकेबाज विजयाची नोंद केली. भारताकडून लाक्रा, सुनील व रघुनाथ या त्रिकुटाने प्रत्येकी एक गोल करत फ्रान्सवरच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
इटली पाचव्या स्थानावर - रविवारी पाचव्या स्थानासाठी इटली -सिंगापूर यांच्यात सामना खेळवला गेला, इटलीच्या आक्रमक खेळीसमोर दुबळ्या सिंगापूरचा निभाव लागला नाही. मार्टा, कोर्सी, न्युझन व सेल्स या चौघांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर इटलीने सिंगापुरचा धुव्वा उडवला. या धडाकेबाज विजयाच्या बळावर इटलीने स्पर्धेत पाचव्या स्थानावर बाजी मारली.
कॅनडाची तिस-या स्थानावर बाजी - ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत तिस-या स्थानासाठी शर्थीची झुंज देणा-या पोलंडला 4-3 गुणांनी कॅनडाने पराभवाची धूळ चारली. भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभवातून सावरलेल्या पोलंडने तिस-या स्थानासाठी कॅनडाविरुद्ध एकतर्फी खेळीचा प्रयत्न केला. मात्र, पहिल्या हाफच्या चौथ्या मिनिटाला शानदार गोल करून पेरेरियाने कॅनडाला आघाडी मिळवून दिली. शॉर्टने 27 व्या मिनिटाला कॅनडाला 2-1 ने आघाडी मिळवून दिली. मात्र, पोलंडच्या ओस्वाझूकने 28 व्या मिनिटाला गोल करत 2-2 ने बरोबरी साधली. त्यामुळे कॅनडाकडून गेस्टने 41 व्या मिनिटाला तिसरा गोल केला.
अविस्मरणीय विजय-नोब्स - संदीप सिंह, लाक्रा, सुनील व रघुनाथ यांच्यासह संघातील प्रत्येकाने केलेली खेळी अपुर्वच होती. याच सांघिक खेळीतुन नोंदवलेला विजय हा अविस्मरणीय आहे.असाच विजय भारत ऑलिम्पिकमध्येही नोंदवणार असल्याचा दावा प्रशिक्षक नोब्स यांनी केला.
लाखांचा वर्षाव - विजेत्या पुरुष संघासह महिला संघावर लाखो रुपयांचा वर्षाव होत आहे. फ्रान्सला नमवून ऑलिम्पिकमध्ये दिमाखदारपणे प्रवेश करणा-या भारतीय पुरुष संघाला तीन लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे हॉकी इंडिया व ललित हॉटेलने जाहीर केले आहे.महिला संघालाही तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत.
जय हो! - लाखो चाहत्यांचे प्रोत्साहनाने द्विगुणीत झालेल्या उत्साहाला कायम ठेवत संदीपने शानदार पाच गोल केले.शेवटच्या क्षणी भारताच्या विजयाची नोंद होताच संदीप सिंहने तिरंगा झेंडा हातात घेऊन सर्वांना अभिवादन केले. या वेळी उपस्थित चाहत्यांनी एका सुरात जय हो चा सुर आवळला.
विजयाचा शिल्पकार - संदीप सिंह- अंतिम सामन्यात गोलची हॅट्ट्रिक, स्पर्धेत केले 16 गोल
संदीप फाइव्ह स्टार! - भारताच्या स्टार डग फ्लिकर संदीप सिंगने पात्रता हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सविरुद्ध धडाकेबाज कामगिरी केली. फ्रान्सच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलत संदीपने शानदार पाच गोल केले. संदीपने पहिला गोल 20 व्या मिनिटाला केला. त्यानंतर 26, 37, 50, 51 व्या मिनिटाला त्याने शानदार गोल केले.
8 चा योगायोग
8 गोल फ्रान्सविरुद्ध भारताने केले
8-1 गुणांनी याच मैदानावर कॉमनवेल्थ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
8 सुवर्ण भारताने ऑलिम्पिकमध्ये पटकावले आहेत.
आता पदकाची आशा! - लंडन ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार प्रवेश करणा-या भारतीय पुरुष संघाकडून आता पदकाची आशा आहे. आठ वेळा भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा
बहुमान पटकावलेला आहे. याच कामगिरीला उजाळा देत भारत पुन्हा एकदा अजिंक्यपद पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारताचा विजयी चौकार
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारताची विजयी हॅट्ट्रिक
ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेत भारतीय संघांचा ‘चक दे’