आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक स्पेशल : यंदा सर्वाधिक पदके मिळण्याच्या अपेक्षा; नेमबाजांकडून अपेक्षा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ऑलिम्पिक स्पर्धेच्या 112 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये भारताने 20 पदके पटकावली आहेत. यामधील दोन पदके (सुवर्ण व रौप्य) भारतीय संघाने नेमबाजीमध्ये मिळवले आहेत. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे 11 स्टार नेमबाज पदकांचा वेध घेतील, अशी आशा आहे. संघामध्ये अव्वल नेमबाजांचा समावेश आहे. स्टार नेमबाज अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण व राज्यवर्धन राठोडने 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवून दिले होते. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतचा सर्वात मोठा भारतीय संघ सहभागी होत आहे. संघामध्ये 13 खेळांमध्ये 81 खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा हा सर्वात मोठा तिसरा नेमबाज संघ ठरला आहे. नेमबाजीमध्ये भारतीय संघाचे पारडे जड आहे. त्यामुळे वैयक्तिक व सांघिक गटात सर्वाधिक पदके मिळवण्याच्या आशा आहेत. संघामध्ये गत चॅम्पियन अभिनव बिंद्रासह गगन नारंग, रंजन सोढी, मानवजीत संधू यासारख्या अव्वल नेमबाजांचा समावेश आहे. मानवजीतने देशाला पदक जिंकून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा भारताला सर्वाधिक पदके मिळण्याच्या आशा आहे.
अभिनव बिंद्रा- भारताच्या अभिवन बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात तो आपले कसब दाखवणार आहे. 2011 मध्ये र्जमनीतील म्युनीच येथील पात्रता फेरीच्या नेमबाज स्पर्धेतून त्याने आपला ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला. गतविजेत्या अभिनवच्या नावे वर्ल्डकप, कॉमनवेल्थ व वल्र्ड चॅम्पियनशिपमधील सुवर्णपदक आहे.
रंजन सोढी- बीजिंगमध्ये आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेतून रंजन सोढीने ऑलिम्पिक स्पर्धेचा प्रवेश मिळवला. डबल ट्रॅपमध्ये तो आपली जादू दाखवणार आहे. डबल ट्रॅपमध्ये निष्णात असलेल्या रंजनने 2011 चा वर्ल्डकप जिंकला होता. विश्वचषक पटकावणारा तो पहिला व एकमेव भारतीय नेमबाज आहे.
मानवजितसिंग संधू- आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवून मानवजितने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. मानवजितने सलग तिसर्‍यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्याने वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला होता. ट्रॅप शूटिंग करणार्‍या मानवजितकडून ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची आशा आहे. माजी वर्ल्ड नंबर वन मानवजितने कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण मिळवले होते.
गगन नारंग- लंडन ऑलिम्पिक स्पर्धेचे गगन नारंगने पहिल्यांदा तिकीट मिळवले. 10 मीटर एअर रायफल व 50 मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात नारंग तरबेज आहे. 2006 मध्ये मेलबर्न येथील कॉमनवेल्थ व 2010 मध्ये दिल्ली येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत नारंगने 4-4 सुवर्णपदके मिळवली होती. म्युनीच येथील स्पर्धेतून त्याने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.