आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Olympic Sprinter Ussain Bolt Takes Girlfriend On Vacation Following Cheating Scandal

रिओत तरूणीसोबत \'रात्र\' घालवल्यानंतर बोल्ट आता गर्लफ्रेंडसोबत \'हॉलिडे\'वर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलयीन तरूणी जेडी दुरांतेसोबत \'रात्र\' घालवल्यानंतर बोल्ट आता गर्लफ्रेंड कासी बेनेटसोबत \'हॉलिडे\'वर गेला आहे. - Divya Marathi
ब्राझीलयीन तरूणी जेडी दुरांतेसोबत \'रात्र\' घालवल्यानंतर बोल्ट आता गर्लफ्रेंड कासी बेनेटसोबत \'हॉलिडे\'वर गेला आहे.
स्पोर्टस डेस्क- जगातील सर्वात वेगवान धावपटू उसैन बोल्ट आपली गर्लफ्रेंड कासी बेनेटसोबत सध्या हॉलिडे एन्जॉय करतोय. रिओ ऑलिंपिकच्या क्लोजिंग सेरेमनीदिवशी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीतील बोल्टचे एका तरूणीसोबतचे अश्लिल फोटो व्हायरल झाले होते. मात्र, यानंतरही बोल्ट आणि त्याची गर्लफ्रेंड कासी यांच्यातील नात्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही.
रिओ ऑलंपिक संपताच बोल्टचे ब्राझीलयीन तरूणी जेडी दुरांतेसोबत अश्लिल फोटोज समोर आले होते. या फोटोत बोल्टने जेडीसमवेत त्या रात्री बेड शेअर केल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोल्ट अनेक तरूणीसमवेत अश्लिल डान्स करताना दिसला होता. यानंतर बोल्टसोबत रात्र घालवलेल्या जेडीने बोल्टबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तसेच बोल्टसोबत आपण रिओ क्रीडाग्राममध्ये संपूर्ण रात्र घालवली असेही सांगितले. बोल्टने आपल्याला कसे इंप्रेस केले व पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन दिल्याचे जेडीने सांगितले होते. त्यामुळे बोल्टचा रंगेलपणा जगासमोर आला होता.
मात्र, या सर्व घटनाक्रमाचा बोल्ट आणि कासी यांच्या नात्यावर कोणाताही परिणाम झालेला दिसत नाही. बोल्टने नुकताच कासीसोबतचे फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. बोल्टने शुक्रवारी सोशल मीडियात हे पोस्ट करताना आपण कासीसोबत हॉलिडेवर गेल्याचे सांगितले. दोघांनी स्नॅपचॅटद्वारे आपल्या हॉलिडेची खबर जगापर्यंत पोहचवली आहे. बोल्टने रिओ ऑलिंपिकमध्ये तीन तर एकून 9 गोल्ड मेडल जिंकली आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बोल्ट आणि कासीने स्नॅपचॅटवरून पोस्ट केलेला व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...