आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरला 51 लाख!;रौप्यसाठी 21, कांस्यपदकासाठी 11 लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॉक्सरने पदके जिंकली तर त्यांच्यावर रोख लाखांच्या पारितोषिकांचा वर्षाव करण्यात येणार आहे. भारतीय बॉक्सर फेडरेशनचे प्रायोजक असलेल्या मोनेट ग्रुपने गुरुवारी ही घोषणा केली. या वेळी स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यास 51 लाख व रौप्यला 21, कांस्य विजेत्याला 11 लाख रोख देण्यात येणार आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होणार्‍या बॉक्सरसाठी नवी दिल्ली येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघामध्ये देंवेद्रो सिंग (49 किलो), शिवा थापा (56), जय भगवान (60), मनोजकुमार (64), विकास कृष्णन (69), विजेंदर सिंग (75), सुमीत सांगवान (81) व मेरी कोम (51) यांचा समावेश आहे.