आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक पुनर्प्रवेशासाठी शिष्टमंडळ लुझानला दाखल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लुझान (स्वित्झर्लंड) येथे येत्या 15 मे रोजी होणार्‍या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबरच्या ऑलिम्पिकमधील पुनरागमनाबाबतच्या महत्त्वाच्या बैठकीच्या तयारीत सध्या भारतीय ऑलिम्पिक संघ आणि क्रीडा मंत्रालय व्यग्र आहे. क्रीडामंत्री जितेंद्रसिंग, क्रीडा सचिव पी. के. देब, नेमबाज अभिनव बिंद्रा आणि ऑलिम्पियन मालव र्शॉफ या चार सदस्यांसह हॉकी इंडियाचे सचिव नरिंदर बात्रा व झारखंड ऑलिम्पिक असोसिएशनचे आर. के. आनंद या बैठकीला भारताच्या वतीने उपस्थित राहणार आहेत.

नरिंदर बात्रा व आनंद यांची या बैठकीसाठी निवड झाल्यानंतर आयओएचे हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा आणि आयओसीचे भारतातील सदस्य रणधीरसिंग यांनी या बैठकीतून माघार घेतली होती. क्रीडामंत्री जितेंद्रसिंग व सचिव देव लुझानमध्ये पोहोचले असून 15 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 ते 12 या अवधीत ही बैठक होईल. 12 ते 12.45 या वेळेदरम्यान आयओसीचे अध्यक्ष जॉक्स रॉग भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत.