आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेने हरवले इंग्लंड संघाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - तीन वेळचा विजेता इंग्लंड व श्रीलंका यांच्यातील सामना रोमांचक झाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 238 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 9 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. श्रीलंकेकडून सलामीवीर चमारी अटापट्टूने 62 व सामनावीर इशानी कौशल्याने 56 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अटापट्टू व यशोदा मेंडिसने पहिल्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी केली.

सामन्यात 238-238 धावांचा रोमांचक क्षण आला. दरम्यान, 49.4 षटकांत श्रीलंकेचा नववा गडी बाद झाला. दोन चेंडू शिल्लक होते आणि लंकेला विजयासाठी 1 धावेची आवश्यकता होती. मात्र, एविल्सच्या पाचव्या चेंडूवर सुरंगिकाला रन काढता आला नाही. तिने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड-238 धावा, श्रीलंका - 244 धावा.