आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On Which No I Would Play Will Decide Team Management Says Kieron Pollard

कोणत्‍या क्रमांकावर खेळायचे याचा निर्णय व्‍यवस्‍थापन घेते : पोलार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- मुंबई इंडियन्सची आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर तुफानी फलंदाजी करून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून देणारा कॅरेबियन खेळाडू केरोन पोलार्डने संघ व्यवस्थापनाचा बचाव केला आहे. पोलार्डला सहाव्या क्रमांकाऐवजी पुढे फलंदाजीस न पाठवल्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनावर टीका होत होती. मात्र, चेन्नईविरुद्ध त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवण्याचा डाव यशस्वी ठरला.

पुढच्या क्रमांकावर खेळण्याबाबत विचारले असता पोलार्ड म्हणाला, ‘मलासुद्धा बर्‍याच वेळा असे वाटते. बाकीचे खेळाडू काय विचार करतात, मला माहिती नाही. संघ व्यवस्थापन प्रत्येक वेळी परिस्थिती बघून संघ निवड करते. यामुळे प्रत्येक परिस्थितीशी एकरूप होण्याचा माझा प्रयत्न असतो.’ असेही त्याने नमूद केले.

* केरोन पोलार्डने ठोकलेल्या 57 धावा, ही त्याची आयपीएलमधील दुसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्याने 2012 मध्ये राजस्थानविरुद्ध 64 धावा ठोकल्या होत्या.

* आयपीएलमध्ये पोलार्डच्या नावे आता 40 डावात 42 षटकार जमा झाले आहेत. मुंबईच्या एका फलंदाजाकडून ही सर्वाधिक षटकार संख्या आहे. आयपीएलमध्ये पोलार्डने पाचव्यांदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला.

* चेन्नईकडून एल्बी मोर्केलनंतर (69 बळी) रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये 50 बळी पूर्ण केले. अश्विनने ही कामगिरी 22.91 च्या सरासरीने केली.

* धोनीने 21 चेंडूंत 51 धावा काढल्या. आयपीएलमध्ये हे त्याचे दहावे अर्धशतक ठरले.

* चेन्नईविरुद्ध खेळताना मुंबईने आतापर्यंत 7 विजय मिळवले आणि 5 मध्ये पराभव स्वीकारला.