आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेलबर्न - भारत दौ-यावर 0-4 ने पराभव झाल्यानंतरही ऑस्ट्रेलिया संघ दोन वर्षांत पुन्हा नंबर होऊ शकतो, अशी आशा प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी व्यक्त केली.
कांगारूंना 43 वर्षांत पहिल्यांदा कांगारूंना मालिकेत 0-4 ने पराभवाचा सामना करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवामुळे टीम आणि प्रशिक्षक आर्थर टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. ‘या दयनीय परिस्थितीतून संघ यशस्वीपणे बाहेर पडेल आणि येत्या दोन वर्षांत नंबर वन होऊ शकेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्थ येथे आगमन झाल्यानंतर आर्थरने प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. नियमाचे उल्लघंन केल्याप्रकरणी चार खेळाडूंना बाहेर करण्याचा निर्णय संघाच्या दृष्टीने योग्य असल्याचेही ते म्हणाले.
‘ही घटना योग्य वेळेची पायाभरणी सिद्ध होईल. आम्ही सहजपणे आयसीसी क्रमवारीत नंबर तीनचे स्थान वाचवू शकतो. मात्र, आम्हाला नियमांचे उल्लंघन कधीही मान्य नाही. आम्ही पुन्हा नंबर वन होऊ इच्छित आहे. यासाठी काही योजना तयार केल्या. या योजनांमुळे आम्ही टीमला येत्या दोन वर्षांत पुन्हा जगात नंबर वन बनवू,’ असे आर्थर यांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियाला आता इंग्लंडविरुद्ध सलग दोन अॅशेस मालिका खेळाव्या लागणार आहेत. इंग्लंडने 2009 मध्ये घरच्या मैदानावर अॅशेस मालिका जिंकली होती आणि पुन्हा 2011 मध्ये ऑस्ट्रेलियात 3-1 ने विजय मिळवला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.