आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाचे वनडे क्रिकेटमधील सिंहासन धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने मागे पडल्यानंतर गेल्या प्रदीर्घ काळापासून वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन असलेल्या ऑस्ट्रेलियाचे सिंहासन धोक्यात आले आहे. या पराभवामुळे कांगारूंना रेटिंग गुणांचे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियाची टीम 123 गुणांवरून 120 गुणांवर घसरली आहे.
इंग्लंडने तीन वनडे जिंकून चार रेटिंग गुण मिळवले. इंग्लंडची टीम आता 116 गुणांसह तिसºया स्थानावर असलेल्या भारताच्या (117 गुण) जवळ पोहोचली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या नावे 112 गुण होते. मात्र, सरासरी विजयामुळे इंग्लंड चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या क्रमांकावर होते. विडींजची टीम सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर मालिका विजय
चेस्टर ली स्ट्रीट - तिसºया वन डेमध्ये स्टीवन फिनची (4/37) घातक गोलंदाजी व जोनाथन ट्रॉट (64), रवी बोपारा (33) यांच्या नाबाद फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 8 गडी राखून मालिका विजय मिळवला. विजयी हॅट्ट्रिक नोंदवत इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 200 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 47.5 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 201 धावांचे लक्ष्य गाठले. 10 षटकांत अवघ्या 37 धावा देऊन 4 बळी घेणारा फिन सामनावीर ठरला.
धावांचा पाठलाग करणाºया इंग्लंडला सलामीवीर कुक व इयान बेल या जोडीने 70 धावांची भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, कुकला (29) मॅकीने झेलबाद केले. त्यानंतर ट्रॉटने तुफानी फटकेबाजी करत बेलसोबत तिसºया गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. बेलला(69) मॅकीने त्रिफळाचीत केले. बोपाराने ट्रॉटसोबत नाबाद 65 धावांच्या अभेद्य भागीदारीतून इंग्लंडला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक - ऑस्ट्रेलिया- 9 बाद 200( डेव्हिड हसी 70, क्लार्क 23, 4/37 फिन) पराभूत वि. इंग्लंड-2 बाद 201 (बेल 69, ट्रॉट नाबाद, बोपारा नाबाद 33, 2/29 मॅकी)