आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रमवारीत भारत नंबर वन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - रांचीत तिसर्‍या लढतीत इंग्लंडला सात गड्यांनी नमवत टीम इंडियाने आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर ताबा मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन वर्षे चार महिन्यांनंतर पुन्हा अव्वल स्थान गाठले. सप्टेंबर 2009 मध्ये श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेदरम्यान भारतीय संघ 24 तासांसाठी नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाला होता. शनिवारी रांची येथील विजयानंतर भारताचे 119 गुण झाले. इंग्लंड टीम 118 गुणांसह दुसर्‍या स्थानी घसरली आहे.

वनडे क्रमवारी
1. भारत (32 सामने, 119 गुण)
2. इंग्लंड (28 सामने, 118 गुण)
3. द. आफ्रिका (19 सामने, 116 गुण)
4. श्रीलंका (38 सामने, 111 गुण)
4. ऑस्ट्रेलिया (31 सामने, 111 गुण)
5. पाकिस्तान (31 सामने, 107 गुण)
6. वेस्ट इंडिज (25 सामने, 88 गुण)
7. बांगलादेश (21 सामने, 78 गुण)
8. न्यूझीलंड (21 सामने, 76 गुण)
9. झिम्बाब्वे (14 सामने, 50 गुण)