आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदिवसीय क्रमवारीत कोहलीच्या सिंहासनावर डिव्हिलर्स विराजमान !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाची ‘रनमशीन’ अर्थात विराट कोहलीला आयसीसी वनडे क्रमवारीतील अव्वल स्थानावरचे आव्हान फार काळ टिकवून ठेवता आले नाही. आयसीसीने नुकतीच वनडे क्रमवारी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेचा वनडे कर्णधार एल्बी डिव्हिलर्स विराट कोहलीला नंबर वनच्या सिंहासनावरून दूर करीत स्वत: अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.
विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका बसला. यामुळे त्याचे नंबर वनचे स्थान हातून गेले. त्याने तीन सामन्यांच्या मालिकेतील दोन डावांत अवघ्या 31 धावा काढल्या. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.
मालिकेतील तीनही सामन्यांत शतक झळकावणा-या दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने 14 व्या स्थानी धडक मारली आहे. त्याने क्रमवारीत तब्बल 61 स्थानांनी प्रगती साधली. त्याने या मालिकेत 114.00 च्या सरासरीने 342 धावा काढल्या. या चमकदार कामगिरीमुळे कॉक मालिकावीरचा मानकरीही ठरला.
दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रमवारीतील आपले सहावे स्थान कायम ठेवले. मात्र, टीम इंडियाच्या इतर फलंदाजांची क्रमवारीत घसरण झाली.