आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Day Series Between India And Srilanka Frome Today

भारत-श्रीलंका वनडे मालिका आजपासून,मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - यजमान भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला रविवारी प्रारंभ होत आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ या मालिकेत खेळत आहे. मालिकेतील सलामी सामना विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला.
‘श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत भारतीय महिला संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेसाठी खेळाडूंनी कसून सराव केला आहे. त्यामुळे आता घरच्या मैदानावर मालिका विजयाचा आम्ही निर्धार केला आहे,’ अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार मितालीने दिली.
‘मालिका जिंकणार’
‘भारत दौ-यावर चांगली कामगिरी करून मालिका जिंकणार आहे. हा दौरा आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. युवा खेळाडूंवरच आमची मदार आहे. या दौ-यात अविस्मरणीय कामगिरी करण्याचा युवा खेळाडूंचा प्रयत्न असेल, असे श्रीलंकेची कर्णधार शशिकला श्रीवर्धनेने सांगितले.