आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे मालिका: सुलतानाचा ‘चौकार’; भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - भारतीय महिला संघाने धडाकेबाज विजयाने यंदा नव्या सत्राला सुरुवात केली. यजमान भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 7 गड्यांनी मात केली. गौहर सुलताना (4/4), झुलन गोस्वामी (2/16) यांच्या धारदार गोलंदाजीपाठोपाठ कर्णधार मितालीने नाबाद 34 धावा काढून भारताला विजय मिळवून दिला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता दुसरा वनडे 21 जानेवारीला विशाखापट्टणम येथे होणार आहे.


प्रथम फलंदाजी करणा-या पाहुण्या श्रीलंकाचा महिला संघ अवघ्या 76 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात भारताने 32.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. सोलापूरच्या अनघा देशपांडे (23) व मितालीने (नाबाद 34) विजयश्री खेचून आणली.


अनघाने मितालीसोबत तिस-या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. राणासिंघेने अनघाला बाद केले. मितालीने 59 चेंडूंत सहा चौकारांसह नाबाद 34 धावा काढल्या.


संक्षिप्त धावफलक - श्रीलंका : सर्वबाद 76, भारत : 3 बाद 80 धावा.


सुलताना, गोस्वामीची धारदार गोलंदाजी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा श्रीवर्धनेने घेतलेला निर्णय भारताच्या सुलताना, गोस्वामीने साफ चुकीचा ठरवला. जयाग्नीच्या (6) रूपाने गोस्वामीने भारताला पहिला बळी मिळवून दिला. यासह तिने रसागिंकाला (4) बाद केले. निरंजनाने मेंडिसला (17) तंबूत पाठवले. अखेर, सुलतानाने चार दिग्गज महिला फलंदाजांना झटपट बाद केले. मेंडिसने सर्वाधिक 17 धावा काढल्या.
गौहर सुलताना
14.1
षटक,
पहिली विकेट (श्रीवर्धने)
16.2
षटक,
दुसरी विकेट (कुमारी हामी)
20.2
षटक,
तिसरी विकेट (कौशल्या)
22.6
षटक,
चौथी विकेट (सुरंगिका)
76 धावांत लंकेचा धुव्वा