आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉर्डसवर रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - क्रिकेटची पंढरी लॉर्डस या इंग्लंडच्या प्रतिष्ठित मैदानावर आगामी २०१९ वर्षात होणा-या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. २०१९ मध्ये जेव्हा एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळला जाईल, तेव्हा अंतिम सामना लॉर्ड््सवर खेळला जाणार आहे. त्याशिवाय २०१७ मध्ये होणारा महिलांच्या वनडे विश्वचषकातील अखेरचा सामनादेखील याच मैदानावर खेळविण्याचा निर्णय आयसीसीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी १९७५, १९७९ तसेच १९८३ मध्ये इंग्लंडच्या लॉर्डसवर अंतिम सामने रंगले होते.
लागोपाठच्या तीन विश्वचषकांनंतर थेट १९९९ मध्ये लॉर्डसवर सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर आता २०१९ मध्येच लॉर्डसवर अंतिम सामना रंगणार असून सर्वाधिक अंतिम सामने खेळवण्याचा मान त्यामुळे लॉर्डसच्या मैदानाला मिळणार आहे. त्यामुळे या मैदानाच्या प्रतिष्ठेत अजून भर पडली आहे.