आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One More Cricketer Injured During Cricket Match In Kolkata

कोलकताः आणखी एका क्रिकेटरला मैदानात डोक्याला लागला बॉल, रुग्णालयात भरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकता (पश्चिम बंगाल)- 20 वर्षांचा क्रिकेटर अंकित केसरी याच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी कोलकत्याचा आणखी एक नवोदित खेळाडू राहुल घोष याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
याबाबत divyamarathi.com शी बोलताना राहुलचे वडील अमिताभ घोष यांनी सांगितले, की क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (सीएबी) सेकंड डिव्हिजन अंतर्गत कोलकता पोलिस आणि विजय स्पोर्टिंग क्लबमध्ये मॅच आयोजित करण्यात आली होती. यावेळी राहुलच्या डोक्याला बॉल लागून दुखापत झाली. तेव्हा तो कव्हरवर फिल्डिंग करीत होता. यावेळी फलंदाजी करीत असलेल्या खेळाडूचा शॉट त्याच्या डोक्याला धडकला. त्यानंतर राहुल जागेवरच कोसळला. सहकारी खेळाडूंनी त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले.
रिस्क घ्यायची नाही, 72 तासांपर्यंत ठेवणार निगराणीत
राहुलच्या वडीलांनी सांगितले, की आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नाईट अॅंगल रुग्णालयाच्या रुम नंबर 408 मध्ये राहुलवर उपचार करण्यात येत आहेत. डोक्याला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची नसल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले आहे. तो सहकाऱ्यांशी आणि कुटुंबीयांशी संवाद साधतोय. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला निगराणीत ठेवले आहे. याच रुग्णालयात सोमवारी अंकितचा मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलियाच्या फिलित ह्युजचा झाला होता मृत्यू
नोव्हेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ओपनर फिलिप ह्यूज याचाही डोक्याला बॉल लागल्याने मृत्यू झाला होता. सीन अॅबॉट यावेळी गोलंदाजी करीत होता. यावेळी ते स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत होते. त्याचे हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टिने कमकुवत होते, असे त्यानंतर आढळून आले. भारतीय क्रिकेटर रमन लांबा याचाही मृत्यू मैदानात झालेल्या दुखापतीने झाला होता.