आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडे क्रमवारीत इंग्लंडने भारताला मागे टाकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- ऑस्ट्रेलियाला वनडे मालिकेत 4-0 ने नमवल्यानंतर इंग्लंडने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहे. मंगळवारी इंग्लंडने मँचेस्टर येथे पाचव्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 7 गड्यांनी पराभूत करून पाच सामन्यांची मालिका 4-0 ने आपल्या नावे केली होती. इंग्लंडचे आता 118 गुण झाले आहेत. भारत 117 गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे.
मालिका विजयामुळे इंग्लंडला सहा रेटिंग गुणांचा लाभ झाला. अव्वल क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला चार गुणांचे नुकसान झाले. ऑस्ट्रेलियाचे नंबर वनचे सिंहासन कायम आहे, मात्र त्याला रेटिंग गुणांत मोठे नुकसान झाले. ऑस्ट्रेलियाच्या नावे आता केवळ 119 गुण आहेत. अव्वल चार संघांत आता केवळ 2 गुणांचे अंतर राहिले आहे.
मात्र, सरासरी विजयाच्या बळावर दक्षिण आफ्रिका 118 गुणांसह दुस-या स्थानावर आहे. भारत या महिन्यात पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीलंका (112) दौ-यावर जाणार आहे. भारताने ही मालिका जिंकल्यास क्रमवारीत फायदा होऊ शकतो.
क्रम टीम गुण
1. ऑस्ट्रेलिया 119
2. द. आफ्रिका 118
3. इंग्लंड 118
4. भारत 117
5. श्रीलंका 112
6. पाकिस्तान 103
7. वेस्ट इंडीज 87
8. न्यूझीलंड 83
9. बांगलादेश 67
10. झिम्बाब्वे 46