आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्‍य आशियाई चॅम्पियनशिप : पदक जिंकून आई-वडिलांना भेट देण्याचा प्रतीकचा मानस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पुण्यात होणा-या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेविषयी प्रतीक निनावेला प्रचंड उत्सुकता लागली आहे. तो प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. प्रचंड मेहनत करून स्पर्धेची तयारी पूर्ण केली आहे. घरच्या मैदानावर होत असलेल्या आशियाई स्पर्धेत चाहत्यांसमोर चमकदार कामगिरीचा विश्वासही प्रतीकने व्यक्त केला.
पुणे येथे 3 जुलैपासून तिस-या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत प्रतीक निनावे पुरुष गटातील 100 व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.


यूथ गटात चॅम्पियन
पुण्यातील प्रतीक हा यूथ ज्युनिअर आणि यूथ नॅशनल अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील चॅम्पियन आहे. कोईम्बतूर येथील यूथ ज्युनिअर व नॅशनल स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवले. त्याने या दोन्ही स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वेळ काढून 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकली होती. त्याने यातील यूथ ज्युनियर गटातील 100 मीटरच्या स्पर्धेत 11.18 सेकंदात अव्वल स्थान गाठले होते. 200 मीटरची शर्यत त्याने 22.20 सेकंदात जिंकली होती.


अपेक्षांचे ओझे नाही
घरच्या मैदानावर स्पर्धा होत असल्याने सर्वांच्या माझ्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, या अपेक्षाच्या ओझ्यामुळे माझ्या मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. स्पर्धेत सहजपणे कामगिरी करण्यावर माझा अधिक भर असेल, असेही प्रतीकने सांगितले. यासाठी आई-वडील व प्रशिक्षकांनीही विशेष असे मार्गदर्शन केले आहे. त्यांनी नैसर्गिकरीत्या कामगिरी करण्याचा सल्लाही दिला.


अनुभवावर फोकस
यूथ ज्युनियर व यूथ नॅशनल चॅम्पियन प्रतीकने आशियाई स्पर्धेत आतापर्यंत आलेल्या अनुभवी कामगिरीवर फोकस टाकण्याचा निर्धार केला आहे. स्पर्धेची त्याने तयारीही चांगल्या प्रकारे केली आहे. निश्चित केलेल्या ध्येयाप्रत जाण्याचा विश्वासही त्याला आणि प्रशिक्षक संजय पाटणकर यांना आहे.


21.20 से.चे लक्ष्य
चेन्नई येथील प्रशिक्षण शिबिर संपवून प्रतीक आता पुण्यात दाखल झाला आहे. आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी करण्यावर त्याचा अधिक भर आहे.


संघात निवड झाल्याने आनंदी
अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी मला भारतीय संघात संधी मिळाली. ही स्पर्धा माझ्यासह आई-वडिलांसाठीही विशेष आहे. त्यांच्यासमोर मी करिअरमधील पहिली आंतरराष्‍ट्रीय स्पर्धा खेळणार आहे. आई-वडिलांना खास अशी भेट देण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही या वेळी त्याने सांगितले.