आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापोवा, मरे उपांत्य फेरीत, उपांत्यपूर्व सामन्यात नदालचा धक्कादायक पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- रशियाची मारिया शारापाेवा अाणि अँडी मरे, टाॅमस बर्डिचने अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे मंगळवारी जगातील माजी नंबर वन राफेल नदालचे आव्हान संपुष्टात अाले.
दुसऱ्या मानांकित शारापाेवाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कॅनडाच्या एडवर्ड बाऊचर्डचा पराभव केला. तिने सामन्यात ६-३, ६-२ अशा फरकाने सरळ दाेन सेट जिंकून शानदार विजय मिळवला. सातव्या मानांकित बाऊचर्डने सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या खेळाडूला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्यामुळे तिला सरळ सेटमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. या सामन्यातील शानदार विजयासह दुसऱ्या मानांकित शारापाेवाने महिला एकेरीच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला.

शारापाेवा-मकाराेवा समाेरासमाेर महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात रशियाच्या मारिया शारापाेवा अाणि मकाराेवा समाेेरासमाेर असतील. एकतारिना मकाराेवाने उपांत्यपूर्व सामन्यात राेमानियाच्या सिमाेना हालेपवर मात केली. तिने ६-४, ६-० अशा फरकाने विजय संपादन केला. यासह तिसऱ्या मानांकित सिमाेना हालेपला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. दरम्यान, सिमाेना हालेपने पहिल्या सेटमध्ये विजयासाठी चांगलीच झंुज दिली. मात्र, तिला अपेक्षित यश संपादन करता अाले नाही. परिणामी तिला हा सामना गमावावा लागला. अाता मकाराेवाला अाता शारापाेवाच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. त्यामुळे रशियाच्या या दाेन्ही तुल्यबळ खेळाडूंतील उपांत्य सामना राेमांचक हाेण्याची शक्यता अाहे.

नदालचे पॅकअप
जगातील माजी नंबर वन राफेल नदालने विजयासाठी दिलेली दाेन तास १३ मिनिटांची झंुज अपयशी ठरली. त्याला चेक गणराज्यच्या टाॅमस बर्डिचने अनपेक्षितपणे पराभूत केले. बर्डिचने ६-२, ६-०, ७-६ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. त्याला यासाठी दाेन तास झंुज द्यावी लागली. मात्र, त्याने सरस खेळी करताना शानदार विजय संपादन केला. तब्बल ७३ मिनिटे शर्थीची झुंज देत बर्डिचने तिसऱ्या टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या सेटमध्ये बाजी मारून सामना अापल्या नावे केला. यासह त्याने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे स्पेनच्या नदालचे यंदाच्या सत्रातील सुरुवातीला जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले.
मरेचा राेमहर्षक विजय
इंग्लंडच्या अँडी मरेने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने सामन्यात अाॅस्ट्रेलियाच्या निक क्रागिअाेसला धूळ चारली. सहाव्या मानांकित मरेने रंगतदार लढतीत ६-३, ७-६, ६-३ अशा फरकाने बाजी मारली. यासाठी त्याला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. अाॅस्ट्रेलियाच्या खेळाडूने घरच्या मैदानावर दमदार पुनरागमन करताना दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, या टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या सेटमध्ये इंग्लंडच्या खेळाडूने विजय मिळवला.

पेस-सानिया अंतिम अाठमध्ये
भारताच्या लिएंडर पेस अाणि सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली. या जाेडीने सामन्यात अमेरिकेच्या एबिगेल स्पीयर्स अाणि कॅनडाच्या सेंटिवागाेच गाेंजालेजवर ७-५, ६-७, १०-८ ने मात केली. यासह त्यांनी स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवले.