आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना, योकोविक विजयी, मिलोस राओनिक आणि डोमिनिका सिबुलकोवाचा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक अाणि सेरेना विल्यमने बुधवारी विजयी माेहीम अबाधित ठेवताना अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जगातील माजी नंबर वन व्हीनसला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. तसेच कॅनडाचा मिलाेस राअाेनिकचेही स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.
अव्वल मानांकित सेरेना विल्यमने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने गतवर्षीच्या उपविजेत्या डाेमिनिका सिबुलकाेवाचा पराभव केला. सेरेनाने ६-२, ६-२ अशा फरकाने सामन्यात विजय संपादन केला. यासह तिने अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित केला. अमेरिकेच्या ३३ वर्षीय सेरेनाने सामन्यात १५ एेस मारून विजय साकारला. या वेळी सिबुलकाेवाने सामन्यात बाजी मारण्यासाठी जाेरदार प्रयत्न केला. मात्र, तिला समाधानकारक यश मिळाले नाही.
‘मी चांगल्या प्रकारची खेळी करून विजयश्री खेचून अाणली. या वेळी सिबुलकाेवानेही विजयासाठी झुंज दिली. त्यामुळे मला माेठी खेळी करावी लागली. यासह मला विजय मिळवता अाला,’ अशी प्रतिक्रिया सेरेनाने विजयानंतर दिली.
व्हीनसचे स्वप्न भंगले
अमेरिकेच्या व्हीनसने उपांत्यपूर्व सामन्यात दिलेली झंुज अपयशी ठरली. तिला मॅडिसन केयने पराभूत केले. अमेरिकेच्या मॅडिसनने ६-३, ४-६, ६-४ ने सामना जिंकला.

पेस-मार्टिनाचा ५२ मिनिटांत विजय
भारताचा लिएंडर पेसने मार्टिना हिंगीससाेबत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जाेडीने उपांत्यपूर्व लढतीत अांद्रेया व पेयावर ६-३, ६-१ ने ५२ मिनिटांत मात केली.
मिलाेस अपयशी; नाेवाक याेकाेविकची अागेकूच
अव्वल मानांकित नाेवाक याेकाेविक अाणि अाठव्या मानांकित मिलाेस राअाेनिक यांच्यात रंगतदार उपांत्यपूर्व सामना झाला. यात सर्बियाच्या याेकाेविकने बाजी मारली. त्याने तीन सेटपर्यंत रंगलेला हा सामना ७-६, ६-४, ६-२ ने जिंकला. यासह त्याने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. मात्र, कॅनडाच्या मिलाेसला पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडावे लागले अाहे.
सानिया-सोरेस उपांत्य फेरीत
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने अापला सहकारी ब्रुनाे साेरेससाेबत बुधवारी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या अव्वल मानांकित जाेडीने ५३ मिनिटांत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सरळ दाेन सेटमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. भारत अाणि कॅनडाच्या या जाेडीने केसी डेलाक्वा व जाॅन पियर्सवर मात केली. त्यांनी ६-२, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. दमदार खेळी करताना सानिया-साेरेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंची दाेन वेळा सर्व्हिस ब्रेक केली. यासह अव्वल मानांकित जाेडीने सामना अापल्या नावे केला.

वावरिंकाचा राेमहर्षक विजय
चाैथ्या मानांकित अाणि गतविजेत्या वावरिंकाने पुरुष एकेरीच्या अंतिम अाठमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने जपानच्या केई निशिकाेरीचा पराभव केला. स्विसच्या वावरिंकाने ६-३, ६-४, ७-६ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला तीन सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. पाचव्या मानांकित निशिकाेरीने तिसऱ्या सेटमध्ये वावरिंकाला चांगलेच झंुजवले. मात्र, टायब्रेकरपर्यंत रंगलेला हा सेट ७-६ ने जिंकून वावरिंकाने पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर सारले अाणि सामना अापल्या नावे केला. यासह त्याने स्पर्धेत अागेकूच केली.